२ जणांचा घेतला होता बळी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
वणी तालुक्यात दोघांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षक वाघाला कोलेर व पिंपरी क्षेत्रात जेरबंद करण्यात आले. गत एक महिन्यापासून या वाघाने तालुक्यात दहशत निर्माण केली होती. त्याला पकडण्यासाठी मेगा ऑपरेशन सुरू हो
यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांची चमू मेहनत घेत होती. कोलारपिंपरी कोळखाणीच्या परिसरातील सबस्टेनश जवळ हा वाघ नागरिकांना दिसला. तेथील त्याने आपली दहशत पसरवली होती. कोलारपिंपरी परिसरात त्याने ठाण मांडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक दहशतीखाली आले होते. सदर वाघ नरभक्षक असल्याने तो येथे सुद्धा धुमाकूळ घालून माणसांवर हल्ला करू शकतो. त्यापूर्वीच त्याच्या हालचालीवर
वनविभागाच्या चमूने लक्ष ठेवले होते. दोन दिवसांपासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवत वनविभागाने त्याला पकडण्यात आज दि. ७ डिसेंबर रोजी यश आले.१५ मीटर अंतरावरून बंदुकीच्या माध्यमाने नरभक्षक वाघावर इंजेक्शने शूट केल्याबरोबर तो काही अंतरावर पळाला. परंतु, लवकरच इंजेक्शनचा परिणाम झाला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले.