
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर मनसेने केलेल्या जोरदार विरोधानंतर अखेर आज राज्य सरकारने माघार घेतली आहे. शालेय शिक्षण मंत्री यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली. त्यानुसार, हिंदी आता राज्यातील शाळांमध्ये अनिवार्य भाषा नसेल. राज्य सरकारने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिक्षण क्षेत्रात हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “हिंदू आहो हिंदी नाही” अशी गर्जना करत सरकारच्या हिंदी धोरणाला कडाडून विरोध केला होता. विद्यार्थ्यांवर भाषेचा अतिरिक्त भार पडेल, तर मराठी भाषेला दुय्यम दर्जा मिळेल व मराठी पतन होईल अशी भूमिका मनसेने घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर नमते घेत हा निर्णय स्थगित केला आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा विजय झाला असून या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राळेगांव शहरात तहसील समोर मोठे फ्लेक्स लावून मराठी भाषा, मनसे व राजसाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देत संपूर्ण वातावरण मराठीमय करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तुषार वाघमारे ओम मडावी, प्रवीण ओंकार, संदिप गुरूनुले, हर्षल पराते, ओम कुमरे, विकी बारेकर, आकाश ससाणे,सुरज ससाणे, कुणाल चिंचाळकर, संकेत पचाटे, मंगेश पारिसे,प्रतिक समजूरकर, सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
