
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
हजारोच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धा यशस्वी.. लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव… स्थानिक मित्र क्रीडा मंडळ राळेगावच्या वतीने स्वर्गीय पांडुरंग हुरकुंडे यांचे स्मृती प्रित्यर्थ.विदर्भस्तरीय कबड्डीचे सामने संपन्न झाले तब्बल पंधरा वर्षानंतर विदर्भस्तरीय कबड्डीचे सामने बघण्यासाठी हजारोचे संख्येने लोक उपस्थित होते आजपर्यंतचे सर्व गर्दीचे रेकॉर्ड यावेळी कबड्डीच्या स्पर्धेच्या माध्यमातून तोडल्या गेले च्या प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिल्या……………. सुभाष क्रीडा मंडळ यवतमाळ प्रथम बक्षीसाचा मानकरी………. यवतमाळ येथील सुभाष क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांकाचे 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले या संघाकडून दया मारबते विशाल खटा रे नितेश आत्राम यांनी विजयश्री खेचून आणली…… द्वितीय क्रमांक चे 41 हजार रुपयांचे रोग बक्षीस जय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळ यांनी पटकावली या संघाकडून पुनीत कुमरे यशवंत जाधव निकेश तारक यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले तृतीय क्रमांकाचे बक्षीस धरती क्रीडा मंडळ दिंदोडा तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस जय हिंद क्रीडा मंडळ वरोरा यांनी पटकावले यांनी काही उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले……….._ क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान कबड्डी खेळात नावलौकिक प्राप्त करणारे दिग्रस येथील प्यारेलाल पवार…. नागपूर येथील अशोक तोटे… लक्ष्मण पवार अमोल बोदडे दादा मेत्रे दिलीप कुमरे तसेचआंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे यांच्या अर्धांगिनी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वैशाली धुर्वे यांचा सन्मान करण्यात आला………… या स्पर्धेत विदर्भातील 16 संघ सहभागी झाले होते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष संध्याताई सव्वा लाखे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष ऍड प्रफुल्ल मानकर तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष अरविंद फुटाणे शहराध्यक्ष प्रदीप ठू णे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी वसंत जिनिंग चे सभापती नंदकुमार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तर बक्षीस वितरण सोहळा माजी मंत्री माणिकराव ठाकरे माजी मंत्री ऍड शिवाजीराव मोघे माजी मंत्री प्रा वसंत पुरके काँग्रेस समितीचे अध्यक्ष ऍड प्रफुल्ल मानकर माजी जी.प अध्यक्ष प्रवीण देशमुख मनीष पाटील कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मा गरूळकर अरुण राऊत कृष्णा कडू ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वा ढोनकर आदर्श ग्राम रावेरी चे सरपंच राजेंद्र तेलंगे किरण कुंमरे खवीसाचे सभापती मिलिंद इंगोले मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष सचिन हु रकुंडे उपाध्यक्ष विनोद नरड सदस्य राजू नागतुरे जगदीश ठाकरे रफिक शेख यांचा सत्कार करण्यात आला…… प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती ……. सतत तीन दिवस हजारोच्या संख्येने कबड्डी प्रेमींची उपस्थिती ही लक्षणीय होती मैदानावर उभे राहण्या जागाही शिल्लक नव्हती.
