राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक 9 ऑगस्ट रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, किन्ही जवादे ता. राळेगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..! याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. मानिकराव कडू यांची उपस्थिती होती..! याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून सर्वांची वाहवाही मिळविली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरापैकी श्री. रजनलवार सर व शाळेचे अधीक्षक इस्माईल दूंगे यांनी आदिवासी दिन का साजरा केला जातो व ह्या दिवसाचे महत्व काय? याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. रजनीकांत दूधकोहळे सर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कु. वर्षा गेडाम मॅडम, कु. भारती जुमनाके, घनश्याम मेश्राम, रवी परतेकी, नानाजी पेंदोर व आशिष लोणबळे यांनी परिश्रम घेतले.