
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी
ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीची प्रक्रिया आज शुक्रवार दि १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पार पडली.यावेळी परिवर्तन पॅनलच्या सौ कलावती उत्तम कोरडे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता.त्यामुळे त्यांच्या अविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शैलेश बेलेकर,सागर इंगोले,बाबुरावजी फुटाणे,सचिन कींनाके,सौ चंदाताई कडू उपस्थित होते.
या निवडणुकीमध्ये सौ कालावती उत्तम कोरडे म्हणून यांची नवनियुक्त वडकी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवड करण्यात आली.
वडकी सरपंच पदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे अनेकांचे मत होते,मात्र या निवडीला विरोधी पक्षाचे एकही सदस्य उपस्थित नव्हते त्यामुळे ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्यामुळे परिवर्तन पॅनलच्या सदस्यांनी ही निवड अविरोध केली.या निवडणुकीसाठी निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून दीपक मस्के यांनी काम पाहिले. त्यांना वडकी ग्रामपंचायतचे सचिव राजेश ढगे यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य,व गावातील मनोज भोयर, विनोद देठे,सुधाकर कडू,प्रशांत पिपराडे, दिलीपराव कडू यांनी नवनियुक्त सरपंच कलावती कोरडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश फुटाणे,श्याम देठे यांनी सहकार्य केले.
यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव पोलीस कर्मचारी अविनाश जाधव,रमेश मेश्राम,किरण दासरवार यांनी बंदोबस्त ठेवला होता.
