श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील अक्षत कलश वितरण

सहसंपादक: रामभाऊ भोयर

येवती येथे श्री हनुमान मंदिर येथे अक्षत कलश देण्यात आले,
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील पूजीत अक्षत कलश, राळेगाव येथून येवती येथे मंदिरात ठेवण्यात आले असून दि.2/1/2024 रोजी भजन दिंडी सह पालखीत गावात अक्षत कलश यात्रा काढण्यात येणार आहे, अक्षत कलश वितरण समिती राळेगाव तालुका संयोजक ॲड प्रितेश वर्मा, प्रशांत महाजन, पारस वर्मा, लक्ष्मीकांत उत्तरवार हे येवती येथे आले असता त्यावेळेस गावातील राम भक्त व हनुमान मंदिराचे विश्वस्त हनुमान बोबडे, वृषभ दरोडे लक्ष्मण भोयर, मोरेश्वर गुडधे, राम कुरटकार, विलास पारधी, राम महाजन, राजु काळे, किसन ठाकुर, मंगेश दरोडे, किशोर वाघ,प्रसाद झोटिंग, प्रदीप गुडधे, प्रज्वल पारधी , अंकित मानकर, रुपेश झोटींग, कुणाल पारधी , संकेत राऊत, मयुर पारधी, प्रज्वल चौधरी, त्यावेळेस उपस्थित होते . मंदिरात पवित्र अक्षता कलश घेऊन आले व सर्वांना 22 जानेवारी रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र याचे लोकार्पण सोहळा बाबत माहिती दिली.