
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी गजानन भोयर तर सचिव पदी मनोज पन्नासे तर उपाध्यक्षपदी मडावी सर तर महिला उपाध्यक्षपदी वीणा राऊत तर कोषाध्यक्षपदी राजेश ढगे तर सहसचिव पदी श्याम काटकर तर महिला संघटक पदी घायवण मॅडम तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून हिवरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सदर ग्रामसेवक संघटना डी एन ए 136 च्या कार्यकारणी निवड प्रक्रियेला ग्रामसेवक संघटनेचे उपविभागीय उपाध्यक्ष मा. संजयजी वानखडे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हिम्मतजी म्हातारमारे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव मंगेश जी गाऊत्रे, राज्य कौन्सिलर तथा विस्तार अधिकारी कृषी कुमारी बनकर मॅडम, अमोल जी काळे तसेच पतसंस्था संचालक अविनाशजी गाणार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली आहे सदर या निवडप्रक्रियाला तालुक्यातील ग्रामसेवक किरण खैरे, संजय झिरपे, मंगेश कुराटकर, मेगा ओमकार, पिंगळे मॅडम, राजू सातगरे, सुनील इंगळे, खडसे, राजू निवल, कांबळे, विनोद उंब्रतकर, संतोष पटाईत, इत्यादी ग्रामसेवकाची उपस्थिती होती.