
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील पिंप्री(सावित्री) येथे विठ्ठलरुक्मीनीच्या मंदिरात चार महीने सुरु असलेली काकड आरती व हरिपाठाची समाप्ती करण्यात आली.शारदा महीला भजन मंडळ पिंप्री, दुर्गा महीला भजन मंडळ पिंप्री, मंजुळामाता महीला भजन मंडळ पिंप्री, माऊली हरीपाठ भजन मंडळ पिंप्री, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ पिंप्री, अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ कुंभा दहेगाव, सती सोनामाता महीला भजन मंडळ खडकी, दुर्गा महीला भजन मंडळ सावेत्री पिंप्री, या भजन मंडळांनी भक्तीमय वातावणात गावातुन विठ्ठलरुक्माईच्या पालखीचे प्रमुख मार्गानी मिरवनुक काढली नंतर मंदिरात येऊन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम करुन समाप्ति करण्यात आली आहे.
