
राळेगाव तालुक्यात गेल्या एक वर्षापासून युवक काँग्रेस तालूका अध्यक्ष पद हे रिक्त होते. युवक जिल्हा अध्यक्ष उन्मेश पुरके हे पद यांच्याकडे होत पण इतर तालुक्यात मात्र युवक अध्यक्ष पदाचे ग्रहन सुटता सुटेना मात्र यवतमाळ येथे युवक काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एॅड प्रफुल्ल भाऊ मानकर, माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके सर ,ओबीसी सेलचे अध्यक्ष अरविंदभाऊ वाढोणकर, राळेगाव तालुका अध्यक्ष राजेन्द्र तेलंगे, उमेश पुरके यांच्या अध्यक्षतेखाली राळेगाव तालुक्यात युवक काँग्रेस अध्यक्ष पदी धवल घुंगरुड यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
