गॅसच्या जळत्या आगीवर नियंत्रण मिळविले ,जिलानी शेख यांच्या साहसी कार्याने स्फोटक दुर्घटना टळली

मौजे सारखंनी येथील आठवडी बाजारात नियमित प्रमाणे कार्यरत असणारे भाजी पाले दुकानदार यांना चहा देण्यास दुकानदार मग्न असताना गॅस ने अचानक पेट धरला आनि ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी भीती पोटी पळ धरला .
भाजीपाला खरेदी करिता जिलानी शेख बाजारात गेले असता जिलानी शेख यांनी आपले शौर्य आणी बुद्धीमतेचा तोल दाखवत जळत्या गॅसच्या आगीवर भिजलेले पोते झाकून आगीस आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली असती परंतु वेळेचे भान दाखवत केलेल्या कार्याने नागरिकांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.