
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )उमरखेड
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत दिनांक 15/06/2023 रोजी इ के वाय सी न केलेल्या लाभार्थ्यांची यादी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करण्यात आली आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 14 वा हप्ता वितरण करण्याची कारवाई सुरू आहे केंद्र शासनाने योजनेच्या केवायसी करणे बंधनकारक केले आहे ई केवायसी आपण आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्र सीएससी सेंटर या ठिकाणी भेट देऊन करून घ्यावे किंवा दिनांक 20 व 21 जून 2023 रोजी ई केवायसी करण्याकरता सभा नियोजित केली आहे तरी सभेमध्ये आधार कार्ड व आधार लिंक मोबाइल क्रमांक सहभाग घेऊन ई केवायसी करून घ्यावे अन्यथा आपण लाभांपासून वंचित राहाल याची नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहेत
