राळेगाव येथे शासन आपल्या दारी उपक्रम लाभार्थ्यांना चेकचे वाटप

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सामान्य जनता केंद्रबिंदू मानून शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता विभागाचे आमदार डॉ अशोक उईके यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगाव येथे समाधान शिबिर योजना कल्याणकारी सर्व सामान्यांच्या आधारे या ब्रीदवाक्या खाली शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला राळेगाव शहरातील सर्व घटकातील लोकांना सामावून घेण्याकरिता विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांचे शासकीय स्टॉल लावण्यात आले होते यात सर्व प्रकारची माहिती योजनांचा लाभ कसा घ्यावा योजना करता लागणारे कागदपत्रे याची माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आली शिबिराचा उद्घाटन सोहळा विभागाचे आमदार डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, ठाणेदार रामकृष्ण जाधव, गट विकास अधिकारी केशव पवार, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, मुख्याधिकारी अनुप अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ,भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे,शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर, किशोर जूनुनकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष अशोक वर्मा यांची उपस्थिती होती शासनाच्या कल्याणकारी योजना गरीब सामान्य सर्व साधारण जनतेपर्यंत पोहोचून त्यांना योग्य मार्गदर्शन करून सूचनांचे पालन करावे यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन आमदार डॉ अशोक उईके यांनी केले उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी विविध योजनांची माहिती दिली मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांनी घरकुल योजना आयुष्यमान भारत योजना अतिक्रमण धारकांचे पट्टे विश्वकर्मा योजना या संदर्भात माहिती दिली याप्रसंगी समस्यांचे निराकरण करण्याकरिता विशेष टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती शहरातील घरकुल योजना व इतर योजनांचे चेकचे वाटप याप्रसंगी आमदार अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील मोठ्या संख्येने महिला पुरुष लाभार्थी याप्रसंगी उपस्थित होते लाभार्थीकरता भोजनांची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे संचालन सागर विटाळकर यांनी केले.