अवैद्य दारूची विक्री करणाऱ्या सिंह ढाब्यावर वडकी पोलिसांची कारवाई

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वडकी येथील नॅशनल हायवे क्र 7 ला लागून असलेल्या सिंह ढाब्यावर वर अवैद्य रित्या दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे वडकी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी दि 12 सप्टेंबर रविवार रोजी रात्री 10 वाजता सुमारास धाड टाकून ढाबा चालकासह एकास अटक केल्याची घटना उघडणीस आली,
ढाबा चालक बबलू सिंह यांचा वडकी येथे नॅशनल हायवे क्र 7 येथे सिंह ढाबा असून तो नेहमी रात्रीच्या सुमारास ढाब्यावर दारूची विक्री करत असल्याची माहिती काही वडकी येथील नागरिकांना मिळाली नागरिकांनी ढाबा चालक बबलू सिंह याला दारू विकेतांना रंगेहात पकडले व पोलिसांनी माहिती दिली लगेच वडकी पोलीस स्टेशनचे बिट जमादार रमेश मेश्राम सह किरण दासरवार यांनी ढाब्याची झडती घेतली असता यात इंग्लिश दारु नं 1 मॅक्डोल 7 बॉटल व देशी दारू 5 पववे असे एकूण 12 बॉटल दारू जप्त करून ढाबा चालक व कारागीर यांचेवर वडकी पोलिसांनी सदरची कारवाई करण्यात आली.पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनायकराव जाधव साहेब करीत आहे
,