मुद्रांक विक्रेत्यांनी नियमित मुद्रांक उपलब्ध ठेवावे :- ॲड प्रितेश वर्मा अध्यक्ष तालुका वकील संघ राळेगाव
(प्रभारी दुय्यम निबंधक, राळेगाव यांना तक्रार सादर)

सहसंपादक-रामभाऊ भोयर

तालुका वकील संघ राळेगाव तर्फे याआधी अनेकदा मुद्रांक विक्रेते यांच्याकडे मुद्रांक (टिकीट) उपलब्ध राहत नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.त्याबाबतच्या लेखी तक्रारी व तोंडी सूचना देखील कित्येकदा देण्यात आलेल्या आहे, परंतु मागील जवळपास एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राळेगाव तालुक्यातून अनेक नागरिक तहसीलमध्ये, उपविभागीय अधिकारी कार्यालय मध्ये, तलाठी, मंडळ अधिकारी व विद्यमान दिवाणी तथा फौजदारी न्यायालय राळेगाव येथे सुद्धा त्यांच्या कामाकरीता येतात त्यावेळी कित्येकदा विविध कामाकरीता त्यांना शंभर रुपयांचा मुद्रांक किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या मुद्रांकाची आवश्यकता असते, त्यासोबतच विविध कामाकरीता विशेत: जमानतिसाठि मुंद्रांक (टीकिटाची) सुद्धा आवश्यकता नागरिकांना असते परंतु चार ते पाच वेळा चक्कर मारल्याशिवाय त्यांना मुद्रांक (टिकीट) उपलब्ध करून मिळत नाही व त्यांचे होणारे काम या गैरसोयीमुळे थांबून जाते व दुरून खेड्यातून गावातून त्यांना परत जानेयेणे करावे लागते.
खरे तर याआधि मुद्रांक जास्त किमतीत विकल्या जाते याबाबती तक्रार सुद्धा आम्ही सादर केली होती, परंतु हा प्रकार थांबाचे नाव घेत नसून अद्याप सुरूच असल्याचे आढळून येत आहे.

सर्व मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांक (टिकीट) नियमित प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या लेखि सूचना देण्यात याव्या अन्यथा नागरिकांना नेहमीच त्रास होत असल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे.खरे तर मुंद्राक विक्रेते मुद्रांक विक्रीचे काम सोडून दुसऱ्याच कामात व्यस्त असतात, त्यांच्या मूळ कामाशिवाय त्यांना इतर कामे महत्त्वाची वाटत असल्यास त्यांना त्यांचे परवाने सरेंडर करायला लावण्याबाबतचे आदेश पारित करण्यात काही हरकत नाही.अशी तक्रार प्रभारी दुय्यम निबंधक, राळेगाव, कार्यालय राळेगाव जि.यवतमाळ यांना ॲड प्रितेश वर्मा,अध्यक्ष तालुका वकील संघ राळेगाव जिल्हा यवतमाळ यांनी सादर केली असून भाविष्याच्या काळात नियमित मुद्रांक उपलब्ध राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.