खडकी गावाजवळ वाहनाची मोटासायकलस्वारला धडक

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

दि २३ नोव्हेंम्बर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास राळेगाव वरून वडकी येथे येत असलेल्या एम एच २६ डब्ल्यू ००२६ या क्रमांकाच्या कारने खडकी गावाजवळ रोडवरील पाण्याच्या टॅंकरजवळ बसून असलेल्या इसमाच्या पायावरून गाडी नेल्याने यामध्ये खडकी येथील दिलीप काळे यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असून त्याला तात्काळ यवतमाळ येथे हलविण्यात आले,कार चालकाने इथेच न थांबता समोर उभी करून ठेवलेल्या दुचाकीला सुद्धा जबर धडक मारली.हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दिलीप काळे यांचा पाय फॅक्चर झाला व दुचाकी पूर्णता चकनाचूर झाली,घटनास्थळावरून कार चालक हा फरार झाला असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार व अपघात ग्रस्त दुचाकी ताब्यात घेऊन जप्त केली आहे. जखमी रुग्णाला यवतमाळ येथे भरती करण्याकरता नेले असल्याने अजून पर्यंत वडकी पोलीस स्टेशनला या प्रकरणाची कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्यामुळे बातमी लिही पावेतो फरार चालकाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.