विदर्भ हाऊसिंग सोसायटीमागिल नाली पाण्याणे तुंबली ; नगरपरीषद लक्ष देणार का ?, यवतमाळातील नालेसफाई केवळ कागदावर


यवतमाळ
प्रतिनिधी::प्रवीण जोशी


दरवर्षी कागदावर नालेसफाई दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले नगर परीषदेकडुन काढली जातात. या वर्षीही अद्यापही विदर्भ हाऊसिंग सोसायटी ईमारत क्रमांक ई तिन मधिल माइंदे चौकतील गोधनी रोड येथील राहत्या घरांच्या सार्वजनिक नाली नियमित साफ होत नसल्यामूळे सोसायटीमधिल नागरीकांनी मुख्याधिकारी नगर परीषद यवतमाळ यांना गुरुवारी (ता.१७) रोजी निवेदन दिले आहे. विदर्भ हाऊसिंग सोसायटी ईमारत क्रमांक ई तिन माइंदे चौक गोधनी रोड येथील वाहणाऱ्या नाल्यांची एक टक्केदेखील साफसफाई नगर परीषदेकडून झालेली नाही असा आरोप सोसायटीमधिल नागरीकांनी केला आहे. जनतेच्या आरोग्याशी चालविलेला खेळ थांबवावा, मूख्याधिकारी यांनी आपल्या कक्षात बसुन कारभार न पाहता प्रत्यक्षात नालेसफाईवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी सोसायटीमधिल नागरीकांनी केली आहे. यवतमाळ शहरातील मुख्य व दाट लोकवस्ती
विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरातून मुख्य नालिला सोसायटीमधील सर्व घरांचे सांडपाणी जाते माञ या नालीची अद्याप एक टक्केदेखील साफसफाई नगर परीषदेच्या आरोग्य विभागाकडून झालेली नाही.
विदर्भ हाऊसिंग सोसायटी
ईमारत क्रमांक ई तिन गोधनी रोड यवतमाळ येथील ईमारतीच्यामागे असलेली सार्वजनीक नाली पाण्याने तसेच कचऱ्यामुळे तुडुंब भरून सोसायटीमधिल तळ मजल्याच्या काही घरांमध्ये संडास तसेच बाथरूमच्या आउटलेट पाईपमधुन संडासाचे घाण पाणी तसेच कचरा घरात येऊन घरातील सर्व वस्तूंचे तसेच नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. सदर नालीच्या प्रवाहात एकुण ५५ ते ६० घरांचे सांडपाणी तसेच कचरा वाहत येऊन ईमारत क्रमांक ई ३ येथे अडून जमा होत आहे. नगर परिषदचे सफाई कर्मचारी नाली सफाई करण्याकरिता येऊन पाहुन जातात परंतु त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता मार्ग नसल्याचे कारण सांगुन हात वर करुन निघुन जातात. दर वर्षी नालेसफाईच्या नावाने कोट्यवधींची बिले काढली जातात. प्रत्यक्षात ही नालेसफाई केवळ कागदावरच असते. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कॉर्नर साइटवर नालेसफाई केली जाते. नाल्याच्या आत मात्र सफाई केली जात नाही. साचलेला गाळ, प्लॅस्टिक, काटेरी झाडे – झुडपांची सफाईच अद्याप करण्यात आलेली नाही. केवळ बिलांमध्ये नाले सफाईबाबत नगर परीषद उदासीन असून, नालेसफाईचे कोणतेही सोयरसुतक त्यांना नाही. फक्त गटारी, रस्ते, यांचे वाढीव टेंडर बनवून बिले काढण्यात ते धन्यता मानत असून, यवतमाळकरांशी त्यांना देणेघेणे नाही. फक्त स्वच्छ भारत मिशनचे बॅनर लावून यवतमाळकरांना मूर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप सोसायटीमधिल नागरीकांनी केला आहे.

तुबंलेली नाली तात्काळ साफ करावी !

विदर्भ हाऊसिंग सोसायटी ईमारत क्रमांक ई तिन मधिल माइंदे चौकतील गोधनी रोड येथील राहत्या घरांच्या सार्वजनिक नाली नियमित साफ होत नसल्यामूळे नाली पाण्याने तुबंली व नागरीकांच्या घरांमध्ये घाणीचे पाणी शिरले आहे. नालीमध्ये साचलेला गाळ, प्लॅस्टिक, काटेरी झाडे – झुडपांची सफाईच अद्याप करण्यात आलेली नाही नगर परीषदेला निवेदन देऊन सुध्दा आतापर्यंत कोणतीही दखल घेताना दिसून येत नाही. नगर परीषदेने हि नाली तात्काळ साफ करावी अशी मागणी सोसायटीमधिल नागरीकांनी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.