जिवनोन्नती पंखांना बळ देण्याचे काम उमेदने केले: खा. भावनाताई गवळी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

भविष्य आपल्या हातात असल्याची जाणिव उद्योगशिल महिलांनी संपूर्ण कुटूंबाची जवाबदारी घेवून कर्तृत्ववान लेकरांना घडविले. आर्थिक सक्षमीकरण, उद्योगची माहीती व संघटनाचे स्वालंबन शासनाच्या जिक्ोन्नती पंखांना बळ देण्याचे कार्य उमेदने केले असे प्रतिपादन यवतमाळ वाशिम लोकसभा संघाच्या खासदार भावनाताई गाळी यांनी केले आहे. आज रविवारी (ता.२१) रोजी बाभूळगाव शहरातील साई मंगलम्मध्ये आयोजीत उमेद महाराष्ट्र राज्य जिवनोन्नती व मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत कार्यक्रमात महिलांशी भावनाताई गमळी यांनी संवाद साधला, यावेळी बाभूळगाव नगर पंचायतच्या नगराध्यक्ष संगितालाई मालखुरे, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख शब्बीर खान, बांधकाम सभापती शबाना परक्नि नईम खान, शिक्षण सभापती जाकीर खान, नगरसेविका मदिना परविन, नारसेवक अमर सिरसाट, अभय तातेड, गौरव तातेड, तालुका प्रमुख वसंत जाधव, गुणवंत ठोकळ, जिल्हा प्रशिक्षण नखाते, व्यवस्थापन अधिकारी निरज गटविकास अधिकारी रविकांत फार, संगिता शिवनकर, सुवर्ण साठे आदीसह शेकडो महिला उपस्थित होत्या

खासदार भावनाताई पुढे म्हणाल्या, महिलांना सक्षम करण्यासठी राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनांची अमलबजावणी प्रभावीपणे संबंधीत यंत्रणेणे राबवावी महिला सक्षम तर देश गाव सक्षम होईल. घरा घरात गावागावात महिलांनी उद्योग निर्माण करावे. यासाठी लोकप्रतिनीधी म्हणून पाठपुरावा करणार असल्याची माहीती यावेळी खासदार गवळींनी दिली नारीशक्तीच्या उन्नतीसाठी शासन कटीबद्ध आहे. राजकीय आश्रयशिवाय महिलांची उन्नती नाही. हे ओळखून केंद्र शासनाने महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण दिले आहे. या आरक्षणाचा लाभ असंख्य महिलांना होणार असल्याची माहीती यावेळी खासदार भावनाताई गवळी यांनी दिली आहे. दरम्यान तालुक्यातील अनेक गावांतून आलेल्या महिलांची लक्षवेधी उपस्थिती असल्याने महिलांसाठीची असलेली ताईंची तळमळ महिला संवादातून पुढे आलेली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी केले. जिवनोन्नती उमेदचा प्रवास निजर नखाते यांनी मांडला. सुत्रसंचालन करूणा नागपूरे यांनी केले. तर आभार अल्का राठोड व चैताली कपिले यांनी मानले.

मेरी झाँसी नही देऊँगीचा पुनर्रउच्चार

सलग पाच टर्मपासून जनतेची सेवा करीत आहे. महिला खासदार असतांना सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत पोहचून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करीत आहे आणखी जणतेची सेवा करण्यासाठी मी सक्षम आहे. मेरी झाँसी नही देगी चा पुनर्रउच्चार खासदार भावनाताई गवळीने बाभूळगावच्या कार्यक्रमात केला आहे