गोदावरी अर्बन बँक शाखा ढाणकी यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन.


प्रती/प्रवीण जोशी
ढाणकी……


गोदावरी अर्बन बँकेचे अध्यक्षा सौ,राजश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनात व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या संकल्पनेने, सध्या रक्ताची टंचाई बघता ढाणकी येथील गोदावरी अर्बन शाखेने दिनांक 8 तारखेला शनिवार रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या समाज उपयोगी कार्यात सहकार्य करावे असे गोदावरी अर्बन शाखा ढाणकी चे शाखा व्यवस्थापक मुकुल पांडे यांनी सांगितले.