अपघात :ट्रॅक्टर व दुचाकीची धडक एक जागीच ठार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील पिंपळापुर येथील युवक विनोद उपाते वय वर्षे अंदाजे 45 हे आपल्या कामासाठी पिंपळापुर वरून राळेगाव येथे आपल्या मोटरसायकल ने गेले असता राळेगाव येथुन आपले कामे आटपुन पिंपळापुर येथे जात असताना खडकी सुकळी स्टाॅप समोरील मंदिरा जवळ समोरून ट्रक्टर हा भरधाव वेगाने येत असताना समोरासमोर दुचाकी ट्रक्टरला धडकली यात विनोद उपाते यांचा जागीच मृत्यू झाला हि माहिती वार्यासारखीच पसरता वाढोना बाजार येथील माजी उपसरपंच प्रकाश पोपट व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व छखमींना मदत केली घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलिस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार पाटील व पोलीस कर्मचारी दाखल होऊन प्रेत उत्तरणीय तपासणी करिता राळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले पुढिल तपास राळेगाव पोलिस करीत आहे.