
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून खैरी हे गाव असून येथील ग्रामपंचायतीची गेल्या अनेक वर्षापासून गृहकर व पानीकर थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कर थकबाकीदारांची जाहीर प्रसिद्धी करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव घेतला आहे.
खैरी ग्रामपंचायतचा गृहकर व पाणी कर थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नात घट होऊन विकास कामावर परिणाम होत आहे. तसेच या थकीत करामुळे ग्रामपंचायतीच्या विकासा कामांना खीळ बसली आहे. त्यामुळे खैरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने दिनांक २९/ १२/२०२२ रोजी मासिक सभेत ठराव घेऊन पाच ते दहा वर्षापासून कर थकबाकी असलेल्या सर्व कर थकबाकीदारांची एक जानेवारी ते 31 मार्च पर्यंत चालणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत मागणी बिल देऊनही व वारंवार सूचना करूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची नाव व रकमेसह याद्या जाहीर करणे, कर थकबाकीदारांचे ग्रामपंचायतीला बॅनर लावणे, नळ कनेक्शन कापणे व जप्तीचे कारवाई करणे असा ठराव घेण्यात आला असून त्यानुसार विशेष वसुली मोहीम राबविणार असल्याचे ग्रामपंचायती द्वारा कळविण्यात आले.
ग्रामपंचायत खैरी येथील गृहकर व पाणीकर रक्कम थकीत असल्याने दिवाबत्ती, पाणीपुरवठा पाईपलाईन लिकेज दुरुस्ती, कर्मचारी पगार इत्यादी कामे करणे दिवसेंदिवस अडचणीचे होत आहे. तेव्हा गावातील नागरिकांनी गृहकर व पाणी कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे
सरपंच सौ. किरण तृषांत महाजन खैरी
ग्रामपंचायत खैरी येथील गृहकर व पाणी कर थकबाकीदारांना वारंवार सूचना करूनही कर भरणा करीत नसल्याने एक जानेवारी ते 31 मार्च या काळात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या मुदतीत कर न भरणाऱ्यावर ग्रामपंचायती बॅनर व यादी प्रसिद्ध करणे तसेच नळ कनेक्शन कपात करणे इत्यादी कारवाई करण्यात येत आहे तरी ग्रामस्थांनी आपला थकीत कर भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे.
डॉ. श्रीकांत ज्ञानेश्वर राव राऊत उपसरपंच
ग्रा. प. खैरी
ग्रामपंचायत खैरी येथील गृह व पाणी कर थकबाकीदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामपंचायती द्वारा नागरिकांच्या समस्या सोडविणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत खैरी द्वारा एक जानेवारी ते 31 मार्च पर्यंत विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत आहे त्याद्वारा नागरिकांनी आपल्याकडील कराचा भरणा मुदतीत करण्यात यावा. कराचा भरणा मुदतीत न केल्यास विशेष वसुली मोहिमेअंतर्गत जाहीर प्रसिद्धी करणे, नळ कनेक्शन कपात करणे, जप्तीची कारवाई करणे इत्यादी कारवाई करण्यात येईल.
जी . एन. भोयर सचिव ग्रामपंचायत खैरी
