कळमनेर येथे अवकाळी पावसाने घराची भिंत कोसळून नुकसान

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात दररोज अवकाळी पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यात तालुक्यातील कळमनेर येथील शेतकरी माधव भाऊराव राजकोल्हे यांच्या राहत्या घराची मातीची भिंत पडल्याने घरात असलेल्या वस्तूचे नुकसान झाले आहे व त्यांना राहण्याची व्यवस्था नाही त्यामुळे प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.