श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील अक्षत कलश वितरण

सहसंपादक : रामभाऊ भोयर

धानोरा येथे श्री राम मंदिर येथे अक्षत कलश देण्यात आले,
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील पूजीत अक्षत कलश, राळेगाव येथून धानोरा येथे मंदिरात ठेवण्यात आले असून दि.2/1/2024 रोजी भजन दिंडी सह पलकित गावात अक्षत कलश यात्रा काढण्यात येणार आहे, अक्षत कलश वितरण समिती राळेगाव तालुका संयोजक ॲड प्रितेश वर्मा, प्रशांत महाजन, पारस वर्मा, लक्ष्मीकांत उत्तरवार हे धानोरा येथे आले असता त्यावेळेस गावातील राम भक्त उपसरपंच विशाल येनोरकर , डॉ श्यामसुंदरजी गलाट, प्रीतम घिनमीने, सुधाकर घिनमीने चंदू कांबडी, अमोल शेंडे, बापू जुनघरे , प्रमोद किन्हेकर, नथूजी बडवाईक, रामुजी भोयर त्यावेळेस उपस्थित होते . मंदिरात पवित्र अक्षता कलश घेऊन आले व सर्वांना 22 जानेवारी रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र याचे लोकार्पण सोहळा बाबत माहिती दिली.