येवती, रोहनी , मुदापूर घटावरूण व नाल्यावरुन अवैध वाळू उपसा,महसूल व पोलीस प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष?

संग्रहित

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

शासनाने लाखो रुपये खर्च करून गाव तीथे तलाठी कार्यालय शेतकऱ्यांच्या व शेतमजूरांच्या सोईसाठी उभारली आहे.परंतु तलाठी मुख्यालय राहतं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजूरांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. सदर तलाठी मुख्यालय राहतं नसल्याचे पाहून रेती तस्कर या परिसरात अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे

राळेगाव तालुक्यात येवती,रोहनी,मुदापुर गोटाडी घाट ,व परिसरातील नाल्यावरुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. सदर या परिसरातील काही गावांना वर्धा नदीचे पात्र लागुन असून यावेळी पावसाळा सुद्धा चांगला झाला आहे त्यामुळे प्रत्येक रेती घाटावर व प्रत्येक नाल्यावर मोठ्या प्रमाणात रेती
आली आहे.
सदर या परिसरातील रेती घाटाचा लिलाव अजून तरी झाला नसल्याने अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.सदर या परिसरातील महसूल विभागाचे अधिकारी वर्ग व पोलीस विभागाचे अधिकारी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यां ट्रक्टर वर जाणुन बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते आहे. तर अवैध वाळू वाहतूक करनाऱ्या ट्रक्टर वर नंबर सुध्दा दिसून येते नाही. तर अवैध रेती वाहतूक करतांना एखाद्या अपघात घडला तर या जबाबदार कोण ? रेती वाहतूक करतांना सुसाट वेगाने वाहने नेली जातात
त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर संबंधित महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्याशी रेती तस्करी करणाऱ्यांचे मधुर संबंध असल्याचेही बोलल्या जात आहे. तर काही महसूल विभागातील कर्मचारी यांच्याही गाड्या रेती तस्करी करणारे तस्कर अवैध रेतीवर चालवत असल्याचेही या परिसरात बोलल्या जात आहे सदर
अनेक रेती घाटावरून व परिसरातील नाल्यावरुन अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे, रोहणी व मुदापूर, येथील नदी नाल्यावरून अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे त्यामुळे यावरही त्वरित महसूल व पोलीस विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.सदर तालुक्यात बाकी नदी नाल्यावरुन अवैध वाळू उपसा केल्यास त्वरित कार्यवाही केली जाते मग येवती, रोहिणी,मुदापुर गोटाडी व परिसरातील नाल्यावरुन अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे यावर कार्यवाही का केली जात नाही ? यावरून असे लक्षात येते की महसूल विभाग व पोलीस विभाग यांचे रेती तस्करी करणाऱ्या सोबत मदूर संबंध असल्याचीही चर्चा सुरू आहे