
प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी
आज अर्धापूर तालुक्याच्या तालुका कार्यकारिणी निवडीच्या कार्यक्रमांमध्ये अनेक युवकांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केला, या निवडी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय माधवराव पाटील देवसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाल्या.
या कार्यक्रमाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष आदरणीय माधवराव पाटील देवसरकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ बालाजी पेनुरकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे ,मराठवाडा कार्याध्यक्ष गणेश काळम पाटील, नांदेड जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, नांदेड जिल्हाध्यक्ष, दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगणुरे ,तालुकाध्यक्ष नांदेड उत्तर नवनाथ पाटील जोगदंड यांची उपस्थिती होती यावेळी अर्धापूर तालुकाध्यक्ष पदी गोविंदराव पाटील गाढे यांची निवड करण्यात आली,तालुका कार्याध्यक्ष पदि नदीम शेख यांची निवड करण्यात आली तालुका सचिव पदी काशीनाथ पाटील गाढे यांची निवड करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
