पत्रकार स्व.संजय जाधव यांच्या जयंती निमित्त अभिवादन

लता फाळके / हदगाव

पत्रकार स्व.संजय जाधव यांच्या जयंती निमित्त तळणी ता.हदगाव या त्यांच्या मूळगावी त्यांच्या व त्यांचे जेष्ठ बंधू स्व.विजय जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले.सिडको नवीन नांदेड भागातून दै.सकाळच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेचे काम करीत असताना अत्यंत कमी काळात आपल्या निर्भीड व सत्य लिखाणाच्या बळावर स्व. जाधव नावारुपास आले होते. सर्वांना मामा म्हणून परिचित असलेले संजय जाधव हे कुठल्याही प्रश्नांवर उपाय शोधे पर्यंत त्याचा पाठपुरावा करत निर्भीडपणे लिखाण करत राहणे ही त्यांची खास करून शैली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अस्थ्याई कर्मचाऱ्यांच्या संघर्षात न्याय मिळवून देण्यात मोठा वाटा राहिला होता.आज ही विद्यापीठातील अनेक कर्मचारी त्यांचे नाव घेतात.
त्यांच्या या जन्मदिनी आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी अभिवादन करण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटिल आष्टीकर, पत्रकार दिपक सूर्यवंशी, रामेशवर बोरकर, बंडु माटाळकर, शंकरराव शिंदे मनुला व सारगे, ओकार, आशिष भुजबळ, अक्षय धांडे पाटिल इत्यादी उपस्थित होते.