

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आपटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सविस्तर वृत्त असे भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपटी जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे.सदर
यावेळी सरपंच ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सोनिका टोरे, उपाध्यक्ष, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सचिव , पडवारी , उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर गावातील सर्व विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आणि ग्रा. पं. मार्फत स्थानिक संसाधन एल. आर. पी. म्हणून सौं. कविता धुर्वे यांची निवड झाली.
