आत्मा अंतर्गत मलकापूर येथे शेतकरी किसान गोष्टी कार्यक्रम.

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक 29 /1 //2025 रोजी मलकापूर येयेथे आत्मा अंतर्गत कृषी उत्कर्ष शेतकरी सेंद्रिय कडधान्य उत्पादक गट आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने क्षेत्रीय किसान गोष्टीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी श्री माननीय सुहास बेंडे साहेब होते व तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अतिथीय भारतीय कृषी अनुसंसाधन परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे शास्त्रज्ञ व नोडल अधिकारी श्री डॉ. जयंत मेश्राम साहेब आणि त्यांचे सहाय्यक श्री अश्विन मेश्राम व विजय गायकवाड साहेब हे होते कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विष्णू गायकवाड यांनी केले व उपस्थित शेतकरी गटांना सेंद्रिय पद्धतीने निविष्ठा कशा बनवायच्या त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवली सोबत कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण हे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी अनुसूचित जाती विकास कृती आराखडा योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या शेडर मशीनचे प्रात्यक्षिक कापूस पिकामध्ये करून दाखवण्यात आले व त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आले तसेच श्री विजय गायकवाड यांनी मशीन हाताळताना घ्यावयाची खबरदारी ची माहिती देण्यात आली नंतर अध्यक्ष भाषणांमध्ये तालुका कृषी अधिकारी श्री सुभाष बेंडे साहेब यांनी तालुका कृषी अधिकारी अंतर्गत येणाऱ्या महाडीबीटी योजनेची माहिती व नैसर्गिक शेती अंतर्गत रब्बी पिकाकरिता लागणाऱ्या निविष्ठा व त्यावर रोग किडी नियंत्रणाकरिता विविध प्रकारचे शेतावर होणाऱ्या गटामार्फत जसे की जीवामृत, दशपर्णी अर्क, वर्मीवॉश ,निंबोळी अर्क , जैविक किड नियंत्रण च्या प्रात्यक्षिक बाबत माहिती तथा उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले सोबत आमला येथील प्रगती शेतकरी श्री विशाल वाघ यांनी आधुनिक शेतीवर मार्गदर्शन व फुल शेती फळपीक, सेंद्रिय पद्धतीने चा अवलंब करून जास्त उत्पन्न घेणे याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आले कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी सल्लागार समितीचे माजी सदस्य श्री अशोक भाऊ उरतकर यांची उपस्थिती होती तसेच गटातील अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी भीमराव काळे, अशोक कांबळे ,अविनाश तेलंग, विजय पाटील ,मिलिंद कांबळे, नारायण कांबळे, वनिता कांबळे, उंबरे लीना उ यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होती व त्यांनी अधिक परिश्रम कार्यक्रमासाठी घेण्यात आले