न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्याध्यापक पदी विजय कचरे यांची नियुक्ती , उपमुख्याध्यापक पदी सुरेश कोवे तर पर्यवेक्षक पदी सूचित बेहरे यांची नियुक्ती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे व सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे यांच्या द्वारे शाळेतील शिक्षकांच्या सेवा जेष्ठते नुसार मुख्याध्यापक पदी शाळेचे शारीरिक शिक्षक विजय कचरे यांची नियुक्ती केली तर उपमुख्याध्यापक पदी शाळेचे एन. सी. सी. अधिकारी व शिक्षक सुरेश कोवे तर पर्यवेक्षक पदी शारीरिक शिक्षक सूचित बेहरे यांची नियुक्ती संस्थे द्वारे करण्यात आली. शाळेतील नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्ती मुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालका द्वारे तसेच समाजातील सर्व स्तरातून नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करण्यात येत आहे…..