
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय,राळेगाव येथील विद्यार्थ्यांचा अमरावती येथे दिनांक 20 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत एन. सी. सी. कॅम्प मध्ये शाळेतील एकूण दहा विद्यार्थ्यांना फायरिंग, रनिंग व सांस्कृतिक कार्यक्रमात गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.. यावेळी 47 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुप सर व शाळेचे एन. सी. सी. ऑफिसर सुरेश कोवे यांनी या विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.. शाळेतील या सर्व गुणवंत एन. सी. सी.विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे व सचिव डॉ.अर्चना धर्मे , मुख्याध्यापक जितेंद्र जवादे,उपमुख्याध्यापक विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे ,व शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,यांनी केले आहे.
