
सहस्त्रकुंड धबधबा हा ओसाडून वाहत असताना याचा सुंदर रूप बघण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भ मधून दूर दुरून पर्यटक पाहण्यासाठी गर्दी करत आहे. असेच एक पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याच्या सुंदर रूप आपल्या आठवणीत सामावून घेण्यासाठी पुसद इथून आपल्या कुटुंबासमवेत आले असता. 1सप्टेंबर च्या संध्याकाळी सातच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सहस्त्रकुंड जेवली मार्गावरी नाल्यालावर पूर आला.पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सदर वाहन चालकाने कार पुराच्या पाण्यात टाकली असता पाहता पाहता कार वाहून गेली. कार मध्ये हाफिज उल्ला खान, आसिया खान व नाजेना खान,सर्व रा पुसद येथील असल्याची माहिती असून. सुदैवाने कार वाहत जाऊन काठाला अडकल्याने कारमधील सगळे सुखरूप बाहेर आले. मात्र कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने सदर कार काढण्यात आली असून. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून पर्यटकाकडून या रस्त्यावरील सगळे पूल उंच करण्याची मागणी होत आहे.
प्रतिनिधी//शेख रमजान
