कृषी विद्यार्थ्यांनी साजर केला स्वतंत्र दिवस, वृक्षारोपण, आणि मतदाना विषयी जागरूकता या विषयावर मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा, व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत हिवरा, ता. हिंगणघाट , जि. वर्धा येथे ७५ वा स्वतंत्रदिन (अमृत महोत्सव) साजरा करण्यात आला. त्या वेळी कृषी सहाय्यक रोहिणीताई मेहेत्रे, ग्रामसेवक स्नेहलताई महाजन, कृषिमित्र, सरपंच शोभाताई कुडमते,पोलिस पाटील प्रियंकाताई जगताप, जि.प. शाळाचे मुख्याध्यापक आंबटकर आणि शिक्षके, ग्रापंचायत सदस्य व गावकरी या वेळी उपस्थित होते. या वेळी मतदान या विषया वर कृषी दुतांनी मार्गदर्शन केले. ज्या व्यक्तीने मतदार संघाच्या यादीमध्ये नोंदणी केली नसेल त्या व्यक्तीने भारत निवडणूक आयोगाचा ‘फॉर्म नंबर ६ ‘ भरून आपली वैयक्तिक माहिती भरून तहसील कार्यालय मध्ये नोंदणी निश्चित करावी व सोबतच वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता केली. या प्रसंगी श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा चे प्राचार्य डॉ. सी. यु. पाटील सर, उपप्राचार्य डॉ.एस.के. नायक सर, रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. व्ही. चिमोटे सर, प्रा. डी. पी. बोंद्रे, व प्रा. पुनसे व डॉ. हरणे इतर प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यार्थी अजय नेवारे, रोहन राडे, ग्रामीण कृषी कार्यक्रमा अंतर्गत माहिती दिली.