राळेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा!


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबऊन साजरा करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयात फळवाटप रुग्णालय परिसरात वृक्षारोपण तथा मजूर दार महिला भगिनींना छत्री वाटप करून सामाजिक बांधिलकीचा परिचय देत वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ॲड फिडेल बायदानी, शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष प्रसाद ठाकरे, राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वर्णलताताई घनमोडे, महीला जिल्हा सरचिटणीस अनिता ताई झोडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष वसंत पोटफोडे, ओ. बी. सी. जिल्हा उपाध्यक्ष गजानन बोभाटे, विद्यार्थि तालुका अध्यक्ष अजिंक्य वैद्य, विध्यार्थी उपाध्यक्ष सौरभ परिसे, किरण तीमांडे, पंकज परचाके, प्रणव गवळी, आकाश वैद्य, ईश्वर ढगले, सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.