
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ होत असतो त्यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसन सन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वर्षांला सहा हजार रुपये दिले जात होते तसेच सहा हजार रुपये नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत दिले जाणार आहेत . नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयाचा पहिला हप्ता एप्रिल महिनामध्ये येईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा चौदाव्या हप्ताही दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे
