
राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिवस म्हणुन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कू. रसिका राऊत, नम्रता शेंडे, गायत्री गाऊत्रे, राणू वाढई यांची भाषणे झाली. संचालन संस्कृती गाऊत्रे तर आभारप्रदर्शन तेजस्विनी पवार हीने केले. आर. एस. वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला वी. एन. लोडे, पि.पि. आसुटकर, बी.कामडी वी. टी. दुमोरे,बावणे, भोयर उपस्थित होते.
