यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनात गजेंद्र कुमार ठूणे निमंत्रित कवी!

 राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 


     

राळेगाव येथील युवा कवी, साहित्यिक, गझलकार ,व प्रसिद्ध भी वक्ते गजेन्द्र कुमार ठूने यांची यवतमाळ जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड झाली असून त्यांना निमंत्रित कवी म्हणून सलग 2 र्या वर्षी हा सन्मान प्राप्त झाला आहे.
यवतमाळ येथे साहित्य अकादमी यवतमाळ यांच्यावतीने जिल्हा साहित्य मंचद्वारा स्व. सुहास भाऊ राऊत आणि स्व. अशोक भाऊ मारावार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित दुसरे यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलन दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सहकार सांस्कृतिक भवन आर्णी रोड यवतमाळ येथे आयोजित केले आहे या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गझल गंधर्व श्री सुधाकर कदम सर हे भूषवणार असून यवतमाळ जिल्ह्यातले प्रसिद्ध वर्हाडी हास्य कवी तथा झी मराठी हास्य फ्रेम हास्यसम्राट उपविजेता कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग उर्फ *मिर्झा एक्सप्रेस* यांची प्रमुख उपस्थिती या साहित्य संमेलनाला लाभणार आहे.
यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी या यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता. यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख व प्रसिद्ध कवी साहित्यिक या संमेलनात भाग घेणार असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे साहित्य संमेलन गाजणार आहे राळेगाव सारख्या ग्रामीण भागातील युवा कवी गजेंद्रकुमार ठूने यांची सलग दुसऱ्या वर्षी यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनात कवी गझलकार म्हणून निवड झाली असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
गजेन्द्र कुमार ठू ने हे राळेगाव येथील कवी,साहित्यिक,गजलकर,व हास्य कलाकार ,मिमिक्री आर्टिस्ट असून या पाहिले त्यांनी अनेक साहित्य समलानात भाग घेतला असून….अनेक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यानं मान लाभला आहे.वादविवाद,वक्तृत्व या सह अनेक राज्यस्तरीय पुरकर प्राप्त गजेन्द्र कुमार ठूने यांचा निवडीने राळेगाव शहरात आनंद व्यक्त होत आहे.