
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव:-शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून खाक होऊन यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक २७ मे रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास राळेगाव तालुक्यातील वनोजा शेत शिवारात घडली. या घटनेत मोठे नुकसान झाले आहे.आग लागल्याची माहिती मिळतात शेतकरी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीने एवढे उग्ररूप धारण केले होते की शेतकऱ्यांना सदर गोठा वाचण्यात अपयश आले. याबाबत माहिती अशी की राळेगाव तालुक्यातील वनोजा शेत शिवारामध्ये शेतकरी प्रशांत नामदेव काचोळे या शेतकऱ्याची शेती असून यामध्ये टिन पत्राच्या बांधलेल्या या गोठ्यामध्ये काचोळे यांनी शेती उपयोगी ठेवलेले साहित्य ज्यामध्ये स्प्रिंकलर पाइप,मोटार पाईप,कुटार,कडबा बैलाचा अन्य चारा आणि सर्व शेती चे साहित्य व गोठ्याचे टिन पत्रे जळून खाक झाले यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.आग कशी लागली याबाबत मात्र कळू शकले नाही.सदर आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो मोबदला मिळून देण्यात यावा अशी मागणी प्रशांत नामदेवराव काचोळे यांनी केली आहे.
