
वरोरा शहरातील सुभाष वॉर्डातील रहिवासी विजय जुनघरे यांच्या घराच्या आवारात ठेवलेली एम एच 34 बी के 3888 क्रमांक असलेली बजाज प्लॅटिना ही गाडी रात्रीच्या अंधारात चोरी केली .
सविस्तर वृत्त असे की विजय जूनघरे यांचे वॉटर फिल्टर दुरुस्ती व विक्री चे दुकान आहे.दुकानातुन सायंकाळी घरी येताना दुकानातील दहा हजार रुपयांची रक्कम गाडीच्या डिक्कीत ठेवून घरी पोहचले .पाणी सुरू असल्याने त्यांनी ती रक्कम गाडीत ठेवली.सकाळी उठल्यानंतर अंगणात गाडी न दिसल्याने त्यांनी शोधशोध केली परंतु गाडीचा काही थांगपत्ता लागेना. त्यामुळे अखेर त्यानी अज्ञात विरुद्ध दुचाकी चोरी केल्याची तक्रार दाखल केली.
पोलीस तक्रारीनंतर तरी आपली दुचाकी आपल्याला मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
