धावती मोटरसायकल जळून खाक

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव ते वडकी रोडवर राळेगाव कडुन सावनेर येथे जात असलेले सावनेर येथील भास्कर पवार , पत्नी , तसेच आई मोटरसायकलने जात असतांना डोंगरगाव बस स्टॉप जवळ धावत्या मोटरसायकल ने अचानक इंजिनजवळ पेट घेतला असल्याचे दिसताच मोटरसायकल वरिल तिघेही गाडीच्या खाली उतरून आग विझविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला असता आगीने रौद्ररूप धारण केले व पुर्ण मोटरसायकल जळुन खाक झाली त्यामुळे मोटारसायकलस्वाराचे लाखोंच्या जवळपास नुकसान झाले आहे. रस्त्यावर आग दिसताच नागरिकांची गर्दी झाली होती .