
कारंजा (घा):-दिनांक २५ डिसेंबर रोज रविवारला मातादिन सभागृह कारंजा घा.येथे प्रथमच आरोग्य विषयक सेमिनारचे आयोजन करण्यात आले यामध्ये सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रविण खापेकर नागपूर यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने भविष्याचा पाया, बालकांचे गर्भातील 270 दिवस व 730 दिवस जन्मानंतरचे किती महत्वपूर्ण असतात या विषयी सखोल मार्गदर्शन केले. बालकांच्या आरोग्य विषयक समस्यांवर फक्त आई वडील कशे जबाबदार असतात ते समजावून सांगितले.छोट्या छोट्या बाबतीत केलेला निष्काळजी म्हणजे भविष्यातल्या अनेक पिढ्या खराब करणे होय म्हणून सजगपणे बाळ जन्माला घालण्या पुर्वी पासून शारीरिक तपासणी करून घेणे जागुकता फार महत्त्वाचे ठरते अन्यथा भविष्यातील खर्च व परीवारीक मनस्ताप वाढविणारा ठरतो असे मत डॉ खापेकर यांनी मांडले.
सदर यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन कारंजा घा.मधे प्रथमताःच करण्यात आले त्याला कारंजा घा. परीसरातीला आशाताईंनी भरघोस प्रतिसाद दिला सोबतच अगंणवाडी कर्मचारी, परीसरातीला महीला, पुरुष,युवकांनी प्रंचड संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाकरीता आयोजक अरविंद सुरोशे मित्र परीवार,
आशा वर्कर संघटना,नागरी संघर्ष समिती, मराठा सेवा संघ,गुरूदेव सेवा मंडल,बुद्धीष्ट ऐम्लॉईज असो,वुक्षमित्र परीवार,त्रिरत्न बौद्ध महासंघ,संभाजी ब्रिगेड, ईत्यादी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रा.सुभाषजी अंधारे सर, तर डॉ.घागरे,डॉ सतई,डॉ. नारपाचे मॅडम , डॉ.दुधे मॅडम,डॉ. कळंबे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करतांना अरविंद सुरोशे यांनी डॉ. खापेकर सरांचे धन्यवाद व्यक्त करत मनोगत व्यक्त केले की तुम्ही आमच्या पिढ्यानपिढ्या आरोग्य श्रीमंतीचा “सुरुवातीचे १००० दिवस” हा मुलमंत्र दिला , आपला अनुभव आणि तळमळ नक्कीच आरोग्यशील,सुदृढ भविष्यातील भारतीय पिढी निर्माण करेल अशी आशा व्यक्त केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रविण भिसे यांनी केले.स्वागत गित आशाताईंनी गायले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगितानी झाली.
सदर यशस्वी आरोग्य विषयी सेमिनार साठी
राजेंद्र ईंगळे,उमेश पाचपोहर,मंगेश जाचक,गुणवंत मुडे,दशरथ डांगोरे,विभाकर ढोले,विनोद चाफले,अशोक नागले,मिथुन कटके,पियुष रेवतकर ईत्यादीनी मेहनत घेतली.
