संकटाशी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती खेळातून निर्माण होते
-प्रताप ओंकार
[ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाट्न ]

सहसंपादक : रामभाऊ भोयर

 

खेळ व क्रीडा स्पर्धा या शालेय जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. जिंकणे हरणे या पेक्षा खेळणे ही बाब महत्वाची आहे.आयुष्यातील संकटाशी लढण्याची दुर्देम्य इच्छाशक्ती ही खेळातून निर्माण होते. विजय हा संयमाने साजरा करता आला पाहिजे व पराभव झाल्यास तो स्वीकारता आला पाहिजे ही शिकवण रुजवन्याचे काम या क्रीडा स्पर्धा करतात असे प्रतिपादन केंद प्रमुख प्रताप ओंकार यांनी केले. केंद्रस्तरीत क्रीडा स्पर्धा उदघाट्न सोहळा प्रसंगी ते बोलत होते.राळेगाव केंद्राच्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा जि. प. उच्च प्रा. शाळा आष्टा येथे दि. 12 डिसें. पासुन सुरु झाल्या.यात केंद्रातील सर्व शाळेचे चमू, शिक्षक सहभागी झाले. चिमुकल्यांच्या विविध क्रीडा आविष्काराने यात रंगत आनली .
या वेळी क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून सरपंचा सोनूताई विशाल तोडसे, उदघाटक म्हणून शाळा व्यव. सं. अध्यक्ष अमोल जुनघरे, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सुनील पारिसे, उपाध्यक्ष व्य. सं. सारिका रंजीत पारीसे केंद्र प्रमुख प्रताप ओंकार,उच्च श्रेणी मुख्य. एकोणकर सर, यांचे सह विध्यार्थी,शिक्षक व पालक उपस्थित होते. सरपंच सोनूताई तोडासे यांनी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा आस्टा येथे घेण्यात आल्याचा आनंद झाल्याची भावना व्यक्त करून सर्वांनी क्रीडा स्पर्धेत विधार्थी योग्य शिकवण अंगीकारतील असा प्रयत्न असू दया अशी अपेक्षा मनोगतातून मांडली.या वेळी एकोणकर सर यांनीही समयोचित विचार मांडले. या वेळी विस्तार अधिकारी निलेश दाभाडे, नवनाथ लहाने यांनी ही क्रीडा स्पर्धेच्या प्रांगणावर भेट देऊन चिमुकल्यांचा उत्साह वाढवला. त्यांच्या उपस्थितीत बोरी विरुद्ध गुजरी हा सामना झाला.
दि. 12 रोजी 1ते. 5 या प्राथमिक गटातील क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.यात लंगडी प्रक्रम क मुली विजेता रावेरी उपविजेता आष्टा, कबड्डी मुली विजेता राजाबाई कन्या राळेगाव उपविजेता सावंगी.कबड्डी प्रक्रम क मुले या गटात विजेता रावेरी उपविजेता राळेगाव मुले या संघांनी बाजी मारली. वैयक्तिक खेळ प्रकारात मुले कैरम यात विजेता सावंगी उपविजेता रावेरी तर मुली मध्ये विजेता नवीन वस्ती उपविजेता राजाबाई कन्या याच गटात बुद्धिबळ यात मुले नवीन वस्ती विजेता तर उपविजेता म्हणून सावंगी तर बुद्धिबळ मुली यात विजेता नवीन वस्ती व उपविजेता राजाबाई कन्या राळेगाव या शाळांनी चमकदार कामगिरी केली. योगासन या गटात मुले व मुली नवीन वस्ती विजेता तर उपविजेता म्हणून सावंगी शाळेने बाजी मारली. दुसऱ्या दिवशी ( दि. 13 ) ला प्रक्रम ब मध्ये कबड्डी खेळात गुजरी संघ विजेता ठरला. वृत्त लिहिस्तोवर प्रक्रम ब चे सामने सुरु आहेत. या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षिका , पालक विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले.