कौमी एकता मंच कोरपना तर्फे ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन,पन्नास रक्तदात्यांनी केले रक्तदान


कोरपना – कौमी एकता मंच कोरपना तर्फे ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन कोरपना येथील राजीव गांधी चौक येथे
मंगळवार दि.१९ ला करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना शेर खान तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आबिद अली, सोहेल अली, इस्माईल शेख, मन्सूर भाई, दाऊत भाई, रहेमान भाई, एजाज शेख, शौकत अली, मकसुद अली,असरार अली आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. या रक्तदान शिबिरात पन्नास रक्तदात्यानी रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन बुरेवार , संचालन कृपाल कोल्हे तर आभार शारिक सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौमी एकता मंच चे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.