मुरूम वाहतूक करणारे 8 हायवा ट्रक जप्त,नायब तहसीलदार यांची कारवाई

शहर प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा


वरोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी गौण खनिजांची अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू आहे.वरोरा शहराजवळ असलेल्या शेंबळ येथे असलेल्या अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा लिमिटेड या कंपनी चे 8 ट्रक अवैधरित्या मुरूमाची वाहतूक कथित असताना नायब तहसीलदार कोळपे यांनी 8 हायवा ट्रक जप्त करीत तहसील कार्यालयात जमा केले आहे.
अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड ही कंपनी वरोरा ते वणी या मार्गाचे बांधकाम करीत आहे .या कंपनीच्या कामासाठी दिवस रात्र हायवा ट्रक ने मुरूम व अन्य गौण खनिजांची वाहतूक सुरू आहे.या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाकडे असणाऱ्या टी पी वर वेळ लिहिलेला नसल्याने दिवसभर एकाच टी पी वर अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केल्याचे नायब तहसीलदार कोळपे यांनी सांगितले. वृत्त लिहिपर्यंत पुढील कारवाई सुरू होती.