यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या वतीने राळेगाव खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून नाफेडची ज्वारी खरेदी करण्याचे शासनाने ठरविले असून त्या अनुषंगाने दिनांक 13/4/2026 पासून 30/4/2026 पर्यंत ज्वारी नोंदणी करण्याचे ठरविले असून ज्वारी नोंदणी करताना खालील गोष्टी लक्षात घेऊन नोंदणीसाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात यावे. अर्जदाराचा नोंदणी अर्ज, अद्यावत 7/12 सन 2025-26 आँनलाईन ज्वारी ई -पिक पेरा असलेला असावा. आधार कार्ड झेरॉक्स ,बॅ़क पासबुक झेरॉक्स, शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी स्वतः हजर राहून लायू फोटो द्यावा लागेल न दिल्यास नोंदणी होणार नाही . सोबतच शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार फक्त एफ.ए. क्यू दर्जाची ज्वारी खरेदी करण्यात येईल. तरी ज्वारी नोंदणी करण्यासाठी व्यवस्थापक संजय जुमडे मो.न.9689064356 व लेखापाल गणेश हिवरकर मो.न.8806298525/9579984161 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
