
(प्रतिनिधी) शेख रमजान
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिटरगांव (बु) येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांनी दिलेले समता, बंधुता आणि न्याय हे विचार समाजाला दिशा देणारे असून, त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करण्याची प्रेरणा उपस्थितांनी व्यक्त केली.
या अभिवादन कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे कर्मचारी श्री. शिवाजी भाऊ पवार, अंकुश राजपल्लू, नामदेव करे, गणेश रणखांब यांच्यासह गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. “महामानवाच्या विचारांना वंदन करून आपण सर्वांनी ‘शिक्षण, संघटन आणि संघर्ष’ या त्यांच्या मूळ मंत्रानुसार पुढे जाण्याचा संकल्प करूया,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
