
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा यवतमाळ वतीने मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यवतमाळ जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्राचे मानधन सात आठ महिन्यांपासून थकले आहे त्यामुळे आशा स्वयंसेविकांना उपासमार सोसावी लागत आहे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे थकीत मानधन तातडीने अदा करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आयटक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे . जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात जुलै २०२५ पासून मानधन थकीत आहे तर बाकी १५ तालुक्यात ऑक्टोबर २०२५ पासून थकीत आहे . दि.१२ नोव्हेंबर २०२५ ला निघालेल्या शासन परिपत्रकात ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे मानधन आधीच राज्य स्तरावरून जिल्हाला अनुदान निधी अदा करण्यात आला आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.शासनाने ऑक्टोबर पर्यंतचा अनुदान निधी आधिच दिला असतांना मग उमरखेड तालुक्यात जुलै २०२५ पासून मानधन थकीत कसे राहिले आहे.तसेच उर्वरित १५ तालुक्यात ऑक्टोबर महिन्यापासुन मानधन थकीत कसे राहिले आहे.असा प्रश्न जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका करीत आहे. शासनाने जिल्हाला ऑक्टोबर पासूनचा अनुदान निधी आधिच दिला असतांना आशा स्वयसेवीकांना मात्र ऑक्टोबर पर्यंत मानधन अदा करण्यात आलेले नाही. ही बाब अन्याय कारक असुन यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात जुलै २०२५ पासून मानधनाची थकबाकी रक्कम तर उर्वरित १५ तालुक्यात ऑक्टोबर २०२५ पासूनची थकबाकी रक्कम अदा करण्यात यावी , अशी मागणी संघटनेने केली आहे तसेच सर्व प्रकारचे थकीत मानधन दि.३१ मे २०२६ पर्यंत अदा करण्यात यावे जर ३१ मे पर्यंत मानधन अदा करण्यात आले नाही तर दि.०१ जुन २०२६ पासून जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका नाईलाजास्तव संपावर जाणार आहे. असे म्हटले आहे. गेल्या सात आठ महिन्यांपासून मानधन असल्यामुळे जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांचे थकीत मानधन अदा करण्यात येवून मागणी निकाली काढण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे केलेली आहे अशी माहिती कॉ.दिवाकर नागपुरे ,जिल्हा सचिव, आयटक आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा यवतमाळ यांनी दिली आहे.
