संविधान आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी निशा गवई (गायकवाड ) यांची निवड


वणी:- येथील निशा रमेश गवई (गायकवाड) यांची यवतमाळ जिल्हा महिला आघाडीच्या संविधान आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी एका पत्रव्दारे ही नियुक्ती केली आहे. व जिल्हा,तालुका व गाव पातळीवर शाखा गठीत करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वांनी अभिनंदन केले.