
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
जिल्हाअध्यक्षपदी रजनीकांत परचाके उपाध्यक्षपदी मनोज पेंदोर तर सचिव पदी मनोहर कुडमते
राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारत जिल्हा व तालुका कार्यकारणी 9 एप्रिल 2026 रोज गुरुवारला रामचंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी रजनीकांत परचाके, तर उपाजिल्हा ध्यक्षपदी मनोज पेंदोर, तर सचिव पदी मनोहर कुडमते, यांची निवड करण्यात आली तसेच तालुकाध्यक्षपदी दिलीप किन्नाके, यांची एकमताने निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया अरविंद केराम यांच्या कार्यालयात पार पडली असून या निवड प्रक्रियेत सहध्यक्ष रमेश पेंदाम, कोषाध्यक्ष मधुकर पावले, संघटक रामचंद्र मेश्राम, संपर्क प्रमुख संतोष गेडाम, प्रमुख सल्लागार अंकुश कुमरे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या वेळी शंकर तोडासे, यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. उपस्थित सदस्य बबन चिडाम, नितेश मडावी,गजानन तुमराम, मारोती उईके,विशाल आत्राम,हे होते.
