आदिवासी गणेश उत्सव मंडळ करंजी ( सो )

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विदर्भातील प्राचीन परंपरेतील ऐतिहासिक उत्सव म्हणजे हाडपक्या ( मस्कऱ्या ) गणपती. या उत्सवाला दीं २१-०९-२४ पासून सुर्वात झाली असून विदर्भात अनेक गावांन मद्ये हा सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) येथे सण २०१० साली बाळ गोपाळ/युवकांनी मिळून हाताने घडवलेली मातीची मूर्ती बसवून गणेश मंडळाची स्थापना केली,

दरवर्षी नव नवीन संकल्पना गावकऱ्यांच सहकार्य तरुणांचा वाढता उत्साह अशा प्रकारे कालांतराने मंडळाचे स्वरूप वाढत गेले,

  

प्रत्येक वर्षी मोठ्या स्वरूपाची गणेश मूर्ती,नव-नवीन वाद्य,मंडळामध्ये महिलांकरिता विविध खेळांचे आयोजन,दहीहंडी स्पर्धा , नृत्य स्पर्धा ,भजन स्पर्धा अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळा द्वारे करण्यात येते.बाळ/गोपाळ महिला,पुरुष,युवक युवती मोठ्या उत्साहाने सहभागी होतात तसेच दररोज मंडळा मार्फत अल्पोपहाराचे आयोजन करन्यात येते व एक दिवस निश्चित करून समस्त गावकऱ्यांन करीता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तिथी वर श्री गणेशाची स्थापना करून मंडळाने यशस्वीरीत्या १५ व्यां वर्षात पदार्पण केले आहे.

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली लोक एकत्रित यावे म्हणून गणेश उत्साहाची सुरूवात केली व एकात्मतेचा संदेश दिला हीच परंपरा आज गेल्या १५ वर्षा पासून करंजी ( सो ) येथे सुद्धा कायम आहे.

: प्रसाद कृष्णराव ठाकरे
सरपंच
ग्रा.पं.करंजी ( सो )