जनसामान्या प्रती तळमळ असलेला नेता : अशोक मेश्राम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे या छोट्याशा गावात जन्मलेले अशोक भाऊ मेश्राम घरची बेताची परिस्थिति असतांना सुध्दा किन्हीं जवादे आश्रम शाळेतुन शिक्षण घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर पोहचले व नौकरीत असतांना आपल्या कार्याचा ठसा उमटविला… पोलिस खात्यात असुन सुद्धा कोणाची मने दुखावली नाही व कधी गोरगरीबावर अन्याय होईल असे कार्य केले नाही आणि हे सर्व करत असताना आपल्या जन्मभूमीला विसरले नाही,सतत समाज बांधवांच्या संपर्कात राहून त्यांच्या साठी जे करता येईल तेवढे पर्यंत करत राहिले,कधी कोणाला पैशाची मदत,तर कधी नोकरीसाठी मार्गदर्शन तर कधी गरजवंताच्या मदतीला धावून जाणे हे कार्य सतत अव्याहतपणे चालू ठेवले त्यांच्या याचं कामाची पोच पावती म्हणजे आज नोकरीचा राजीनामा देऊन राळेगाव मतदार संघात दाखल झाल्याबरोबर त्यांच्या भोवती जनसामान्यांच्या जो गोतावळा दिसतो ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे.
राळेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कडून अनेकांनी उमेदवारी आपल्यालाच मिळाली पाहिजे यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, करायलाच पाहिजे तो त्यांचा लोकशाहीत हक्क पण आहे परंतु त्यांचे कार्य काय ? गेल्या पाच वर्षांत जनसामान्याच्या प्रश्नासाठी सरकार विरोधात कोणता लढा उभारला .जनतेचे अनेक प्रश्न जे तालुका पातळीवर सुटण्यासारखे होते त्यासाठी पण कधी रस्त्यावर उतरले नाही व सरकारला जाब विचारला नाही आणि ही मोठी उणीव मतदारसंघातील जेव्हा अशोक मेश्राम यांनी बघितली व आपल्या निवडक मित्रा समवेत चर्चा करून जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राजकारणात उडी घेतली, मुळात त्यांचा राजकारण हा पिंड नाही पण जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वावर आधारित कार्य करण्याचे ध्येय उराशी बाळगून ते या क्षेत्रात आले आहे.
आपल्याबरोबर राळेगाव येथे ठाण मांडून सतत जनतेच्या प्रश्नावर आंदोलन उभारुन त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत आहे.
जनसामान्यां प्रती त्यांची असलेली तळमळ व गोरगरीबावर होणार्या अन्याया प्रती चीड बघुन लोक त्यांच्या कडे आकृष्ट होत आहे,व जनता आपला भावी प्रतिनिधी कसा असावा यावर चर्चा करुन खाजगीत अशोक भाऊ मेश्राम यांना पसंती दर्शवित आहे .