
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात डिजिटल वित्तीय समावेशन कार्यक्रमांतर्गत फिनास्ट्रा CSR व अफार्म पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात डिजिटल परिवर्तनाची नवी लाट निर्माण होत आहे. राळेगाव क्लस्टरमधील 10 गावांमध्ये डिजिटल सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर (कोदुर्ली) येथे ओम डिजिटल सेवा केंद्राचे उद्घाटन दि. 13 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
या सोहळ्यास कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगावचे संचालक विनोद भाऊ काकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. कुणाल भोयर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत डिजिटल सेवेचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमास अफार्म पुणेचे डिजिटल सखी कार्यक्रम समन्वयक राहुल पडोळे व प्रभाग समन्वयक अभिजित भगत यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी सांगितले की, या डिजिटल सेवा केंद्रांमुळे ग्रामीण नागरिकांना शासकीय योजना, बँकिंग सेवा, ऑनलाइन व्यवहार व विविध डिजिटल सुविधा आता गावातच सहज उपलब्ध होणार आहेत.
या उपक्रमात डिजिटल सखी म्हणून प्रियांका वाकुलकर, शीतल कांबळे, भाग्यश्री कुरवाडे, जयश्री शेंडे, प्रतिभा सातपुते व स्वाती रामटेके यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेचा संदेश पोहोचवण्याचे कार्य सुरू केले आहे.उद्घाटन सोहळ्यास गावातील मान्यवर उपस्थिती प्रकाश भाऊ खुळसंगे,मंगेश ठाकरे, गजानन होले, मनोज भाऊ कुंभरे,सुभाष मूरसकर, मनोज वाकुलकर गावातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात डिजिटल सक्षमीकरणाला चालना मिळणार असून, राळेगाव तालुका डिजिटल प्रगतीच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकत आहे.
